: सध्याच्या डिजिटल युगात यशस्वी व्हायचे असेल तर वाचन व संस्कृती जोपासली पाहिजे वस्तू व विक्रीकर उपायुक्त (जिएसटी) नितीन बांगर पुणे.;
येरमाळा पत्रकार बहुद्देशीय सामाजिक संस्थेने
पत्रकार दिनाचे औचित्य साधुन गावातील विविध शालेय स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले,पुण्याचे विक्री व वस्तुकर उपायुक्त (जिएसटी)
नितीन बांगर,स्टेट बँक शाखा व्यवस्थापक महेंद्र भोर,सरपंच मंदाकिनी आबासाहेब बारकुल,माजी सरपंच विकास बारकुल प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री. येडेश्वरी देवी,आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमा पूजन करून दिपप्रज्वलना ऐवजी रोपट्याला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालुन करण्यात आली.
शाळेतील विविध स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांचे अनुक्रमे प्रथम सॅक,द्वितीय कादंबरी, तृतीय थोर पुरुष चरित्र पुस्तक ट्रॉफी देऊन तर गावातील सेवा निवृत्त शिक्षकांचा फेटा, शॉल,ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी उपस्थित राजकीय पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक यांचा पत्रकार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फेटा बांधून,शाल,ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
येरमाळा पत्रकार बहुउद्देशीय सामाजिक संस्था प्रतिवर्षी पत्रकार दिनानिमित्त गावातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या निबंध लेखन,वक्तृत्व स्पर्धा घेऊन ६ जानेवारी पत्रकार दिना निमित्त बक्षीस वितरण सोहळा,व परिसरातील विविध प्रशासन सेवेत अधिकारी झालेल्या मान्यवरांना निमंत्रित करुन विद्यार्थ्यांना मार्गर्शन व्हावे म्हणुन कार्यक्रम आयोजित करुन पत्रकार दिन साजरा केला जातो याच कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपायुक्त नितीन बांगर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, सध्याच्या तंत्रज्ञानाची प्रगती पाहता आता मोबाईलचे डिजिटल युग आहे.पूर्वी एखाद्या विषयावर अभ्यास करायचा म्हंटले की विविध नियत कालिके,पुस्तकांची शोधा शोध करावी लागायची,त्यात वेळ वाया जात असे पण सध्याच्या डिजिटल युगात तुम्हाला मोबाईलच्या एका क्लिकवर कांहीही माहिती उपलब्ध होते. तसे मोबाईलचे दुष्परिणाम ही आहेत मात्र आपण त्याचा वापर कशासाठी करतो याचे भान ठेऊन या डिजिटल मिडीयचा उपयोग अभ्यासासाठी केला तर तुम्हाला यश शंभर टक्के मिळते,सध्या डिजिटल मीडियामुळे वाचन संस्कृती कमी होतं चालली आहे. तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर माध्यमिक शिक्षण काळात वाचन संस्कृती जोपसली पाहिजे असे मतं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मांडले.
कळंब चे तहसीलदार हेमंत ढोकले यांनी बोलताना सांगितले की मी राज्याच्या अनेक भागात सेवा केली पण पत्रकारांची रजिस्टर्ड बहुउद्देशीय संस्था पहिल्यांदाच पाहिल्याचे सांगुन पत्रकार दिना निमित्त विद्यार्थ्यांच्या स्पर्धा, बक्षीस वितरण करुन अनेक वर्षांपासून पत्रकार दिन साजरा करणे उपक्रमाचे कौतुक केले. माजी सरपंच विकास बारकुल यांनी येरमाळा पत्रकार संस्था अनेक सामाजिक उपक्रमात कार्यशील असते सर्व पत्रकार पूर्ण वेळ व्यावसायिक असुन त्याचे सामाजिक उपक्रम पाहुन ग्रामपंचायतने पत्रकार संस्थेला जागा दिल्याचे सांगत या जागेवर संस्थेला मिळालेल्या ग्रामविकास मंत्रालयाच्या पन्नासलाख निधीतुन परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, व्यायामशाळेच्या दोनमजली इमारतीचे कामं प्रगती पथावर असल्याचे सांगून पत्रकार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संस्थेचे सचिव दत्ता बारकुल यांनी सूत्रसंचलन हनुमंत पडवळ यांनी केले. तर आभार संस्थेचे अध्यक्ष सचिन बारकुल यांनी मानले.
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी धाराशिव
मो.9922764189