सचिन बिद्री:उमरगा
राजमाता जिजाऊच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येत आला, तर उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान दि .१२ रोजी करण्यात आला. यामध्ये पाच कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, रामकृष्ण बिराजदार आणि बाबा जफरी यांची प्रमुख उपस्थिती होती .
जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्तुत्ववान महिलांचा त्यांच्या कार्यस्थळी जाऊन सन्मान करण्यात आला,यात तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत कर्तव्य पार पडत असलेल्या दबंद पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले,अल्पावधीत सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक क्षेत्रात आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करणाऱ्या ज्ञानज्योती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा अॅड . आकांक्षाताई चौगुले,व रुग्णसेवेत सेवा देणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.कोमल गरड- जाधव,गुंजोटी येथील डॉ.अनिस फातेमा शेख आणि संपूर्ण आयुष्य शैक्षणिक कार्यात योगदान देत आजही शेती सांभाळत आपल्या कुटुंबातील पुढील पिढी उद्योजक बनवून समाजासमोर आदर्श ठेवला अशा भारत विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती लक्ष्मीबाई माने यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शमशोद्दीन जमादार,सुनिता पावशेरे,शंतनू सगर, भाऊसाहेब बिराजदार कारखान्याची संचालक तुकाराम बिराजदार, व्हंताळ वि.का.सो . चेअरमन प्रताप महाराज,जिजाऊ ग्रुपच्या अस्मिताताई पाटील, ऋषी सुरवसे, आदीसह प्रमुख पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.