प्रतिनिधी आयुब शेख
धाराशिव पोलीस दलातील कार्यरत असलेले कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाचे मूल्य जपणाऱ्या . आणि प्रत्येक क्षणाला .प्रत्येक घटनेला सदैव तत्पर मातृभूमीच्या रक्षणाला पोचणारे वर्दीतील देव माणूस म्हणून ओळखले जाणारे. तुळजापूर तालुक्याचे उपविभागीय
पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याने पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला.
पोलीसांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस अधीक्षक, संजय जाधव यांच्या संकल्पनेतून श्री. तुळजाभवानी मातेचा नवरात्र उत्सव हा शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडल्याने तसेच तुळजापूर तालुक्यातील खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, ऑपरेशन मुस्कान अंतर्गत या सारख्या अनेक गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करुन गुन्हे उघडकीस आणने अशा मुद्यांतर्गत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-उपविभागीय पोलीस अधीकारी .डॉ निलेश देशमुख, यांना पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांसह पोलीस अधिकारी- अंमलदार उपस्थित होते.