पैठण पैठण शहरात दर्पण दिनाचे औचित्य साधून जिल्हा मराठी पत्रकार संघ छ.संभाजीनगर संलग्न पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील दैनिक भास्कर वृत्तपत्राचे निर्भिड पत्रकार म्हणून प्रसिद्ध असलेले मुफिद पठाण यांना ‘ बेस्ट क्राइम रिपोर्टर ’ म्हणून सन्मानित करण्यात आले

त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे सोमवार दि .6 जानेवारी रोजी दर्पण दिनानिमित्त पैठण तालुका पत्रकार संघाच्या वतीने पैठण पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात पैठण चे तहसीलदार सारंग चव्हाण, पैठण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख, सरपंच शिवराज भूमरे यांच्या हस्ते पत्रकार मुफिद पठाण यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी त्यांचा सन्मानचिन्ह ,शाल,बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पं.स.गटविकास अधिकारी श्रीमती मनोरमा गायकवाड, माजी नगरसेवक भूषण कावसनकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष जितुसेठ परदेशी,भाजप शहराध्यक्ष सिद्धार्थ परदेशी , जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनिल म्हेत्रे , तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन आवारे , विजय सुते यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्र संचालन पत्रकार दादा गलांडे यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार गजानन आवारे यांनी व्यक्त केले यावेळी तालुका उपाध्यक्ष अनिल गाभुड, माजी तालकाध्यक्ष हबीब पठाण , पत्रकार दादा गलांडे, रमेश शेळके, मनोज परदेशी ,शकील खलिफा ,विजय चिडे, शेख मुनाफ, शिवाभाऊ दौंड,शेख आरेफ, नितीन ब्रह्मराक्षस , दत्ता मुळे, कृष्णा मुळे सुनील बदर सह शहर व ग्रामीण भागातील असंख्य पत्रकार उपस्थित होते.

NTV NEWS MARATHI
बिडकीन प्रतिनिधी अलीम शेख छत्रपती संभाजीनगर