♦️पाथर्डी तालुक्यात अवैध मावा व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून तब्बल ३ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबलू छबु सय्यद, (वय २४), आदिलखान शेरखान पठाण, (वय २४, दोघे रा. पागोरी पिंपळगाव, ता.पाथर्डी), ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे.


♦️पथकाने विविध रंगाचे सुगंधित तंबाखू  पुडे, ३५ किलो तंबाखू व सुपारी मिश्रीत मावा, १०० किलो बारीक सुपारी, एक इलेक्ट्रीक लोखंडी मशीन, एक इलेक्ट्रीक वजन काटा, दोन मिक्सर व चुना पॅकेट असा एकूण ३ लाख ८२ हजार रूपांच्या मुद्देमाल हस्तगत केला. तसेच शहानूर मोहिद्दीन शेख, मोहिद्दीन हसन शेख (दोघे फरार) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गणेश लोंढे, शिवाजी ढाकणे, मयूर गायकवाड यांच्या पथकाने केली.