NASHIK | प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी शेतीच्या वादातून कळवणमधील गोळाखाल येथील जिजाबाई देविदास पवार वय ४७ या महिलेला ट्रॅक्टर खाली चिरडून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
अभोणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल दि २६ जानेवारी रोजी शेत गट क्रमांक २१६ मध्ये घरासमोर राहणाऱ्या पवार कुटुंबीयांकडे राहत असलेल्या जमिनीवरती विधवा बहीण सूकरीबाई पवार हि आरोपी सुरेश विठ्ठल पवार यांचेकडे राहत असल्याने तिच्या वाटणीस आलेली दोन एकर जमीन तोच कसत होता परंतु सदरची विधवाबहीण मयत झाल्याने तिच्या वाटणीस आलेली दोन एकर जमीन हि सर्व चार भावांमध्ये समान वाटप व्हावी म्हणून त्यांच्यात वाद सुरु होते.
जखमींना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे तर आरोपींविरुद्ध अभोणा पोलीस ठाण्यात देविदास विठ्ठल पवार यांच्या फिर्यादीनुसार भादंवि कलम १०३ (१), १०९, ११८ (१), ४९ १८९ (२) १९१ (२) १९१ (३) १९० नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्यासह अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. व मृतदेह कळवण उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे व त्यांचे सहकारी करीत आहेत. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
प्रतिनिधी
अनिल पवार, कळवण नाशिक