नाशिक
नाशिक येथील सारिका नागरे यांचं सामाजिक काम कार्य बघून हा पुरस्कार एका कार्यक्रमा दरम्यान त्यांना देण्यात आला.
अध्यात्मात अंधश्रध्दा नसते, असे प्रतिपादन धर्माचार्य १००८ महामंडळेश्वर दत्तात्रेय महाराज दहिवाल यांनी दत्त दिगंबर पीठ,श्री क्षेत्र लाडगाव येथे केले.
ते म्हणाले, १०८ महतांच्या माध्यमातून कार्याला गती द्यायची आहे. आतापर्यंत दहा महंतांना दीक्षा देण्यात आली आहे.
धर्माची व्याख्या निश्चित नाही. त्या व्याख्येलाही मर्यादा आहे. परंतु स्त्री- पुरुष समानता व माणुसकी धर्म हा हाच खरा धर्म होय. यात कुठल्याच भेदभावाला थारा नसावा.अंधश्रध्दाही नसावी. दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही श्रीदत जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात अन्नदान,भजन , नामस्मरण व पुरस्कार वितरण करण्यात आले. राजेश बुराडे (पंढरपूर) व रामेश्वर घोडके पाटील (बिडकीन) यांना धर्मभूषण तर नाशिक येथील सारिका नागरे यांना नारी शक्ती पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.ॲड.अर्चना गोंधळेकर,प्रा.डॉ. मोहन देशमुख, बदाम तौर पाटील, १०८ महंत वीर भगीरथेश्वर बाबा, सोलगव्हाण, गुजरातचे हिरगिरी बापू,रामेश्वर महाराज,बाबूराव खंडागळे महाराज, गांगुर्डे महाराज, सुरेश टाक, कमलाकर दहिवाल आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सोपानराव मुंडलिक, मधुकरराव टाक, सरपंच गजानन बागल,राहुल दहिवाल,मयुर वंजारी ,परमेश्वर माताडे ,ज्ञानेश्वर तांबे ,बळीराम बागल ,चंद्रकांत धाडगे ,अरूण अबनावे,शंकरराव डहाळे,अशोक मैड,पूजा उदावंत,
प्रयाग तांबे,गयाबाई बागल आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

मंत्रोच्चारात व पुष्प वृष्टी करीत व टाळ्यांच्या गजरात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या पुरस्काराने माझी जवाबदारी वाढली आहे. एक प्रकारचे प्रोत्सानच मिळाले आहे व यापुढे मी अधिक जोमाने सामाजिक कार्य करणार असल्याची ग्वाही पुरस्कार स्वीकारल्यानंतर सारिका नागरे यांनी दिली.समााजिक कार्यातून तळागाळापर्यंत पोहचता येते असे ॲड.गोंधळेकर म्हणाल्या.
N TV न्युज मराठी प्रतिनिधी जब्बार तडवी