विविध रानभाज्यांचे विद्यार्थ्यांनी मांडले स्टॉल
डांग सेवा मंडळ नाशिक संचालित डॉ. विजय बिडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अभोणे येथे विज्ञान शाखेच्या वतीने रानभाजी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन अभोणा ग्रामपालिकेच्या सरपंच सुनीताताई पवार यांच्या हस्ते झाले.
महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य चंद्रशेखर जोशी उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. परशराम वाघेरे यांनी रानभाजींचे जीवनातील महत्त्व सांगितले. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी परिसरातील उपलब्ध रानभाज्या जाईचा मोहोर, कुरडू, गोयची, कडूकंद तरोटा ,कवडी घोळ, तोंडली, पाथरी, मोह, रान उडीद ,आवळा ,दूध कुडा, रान बोर, देवकरुडू, गावठी पांढरी भेंडी, काटेमाट, चाकवत कपाळफोडी, देवीची भाजी, चिकन खरबटा, अशा अनेक रानभाज्यांचे स्टॉल मांडले होते. रानभाज्यांच्या प्रदर्शनाबरोबरच रानभाज्यांचे फायदे व औषधी गुणधर्म याविषयीची माहिती असलेले पोस्टर्स लावले होते. विद्यार्थ्यांनी ५५ प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन मांडले होते.त्यामुळे उपस्थिता॑ना रानभाज्यांचे महत्त्व समजले. रानभाजी प्रदर्शनासाठी यशस्वीतेसाठी प्रा. हर्षदा राजभोज, प्रा.रूपाली चौधरी, . प्रा.हर्षदा कहांडोळे, प्रा. श्रद्धा पाटोळे,
यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
एन टीव्ही न्यूज मराठीसाठी अनिल पवार कळवण नाशिक