स्वप्निल अहिरे, आराई वार्ताहर :- कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राज्य अध्यक्ष तथा मंत्री बच्चुभाऊ कडू व राज्य सरचिटणीस गिरीश भाऊ दाभडकर यांच्या नेतृत्वाखाली एनजीपी ४५११ ही संघटना लढत आहे व त्यांचे हात बळकट करण्यासाठी व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बागलाण तालुक्यात संघटना कार्यान्वित करण्यात आली आहे. तळागाळातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून देवळा, कळवण पाठोपाठ बागलाण तालुक्यातही संघटना विस्तार करण्यात आला असून संघटनेची मासिक सभा पंचायत समितीच्या आवारात संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष सुभाष घोलप यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन चर्चा करण्यात आली. त्यावेळी संघटनेचे कर्मचारी दादाजी अहिरे यांनी सांगितले की, आपणास आज सर्वांच्या उपस्थितीत नवीन तालुका कार्यकारणी जाहीर करायची आहे त्यावर सर्वानुमते अध्यक्ष म्हणून जोरण येथील मनोहर सावकार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर इतर पदे जाहीर करण्यात आली असता उपाध्यक्ष म्हणून तालुक्यातील ज्येष्ठ कर्मचारी दिपक आहिरे यांचे नाव जाहीर करण्यात येऊन उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर सचिव पदासाठी सर्वांनी कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी प्रयत्नशील असणारे व कसमादे परिसरात संघटनेचे रोपटे लावण्यासाठी काम करणारे स्वप्निल आहिरे यांचे नाव पुढे करण्यात आले असता सर्वानुमते त्यांची तालुका सचिव म्हणून निवड करण्यात आली. तर सहसचिव म्हणून लखमापूर येथील जिभाऊ देवरे यांची, सरचिटणीस म्हणून रतन बकाराम पवार यांची तर जिल्हा संघटक म्हणून दादाजी आहिरे यांची नेमणूक करण्यात आली. बैठकीचे कामकाज सुरू असतानाच नवनिर्वाचित सचिव यांनी सुचविले की आपल्या तालुक्यात आठ गट असून प्रत्येक गटातून एक सदस्य आपण कार्यकारणीत घ्यावे. त्यावर उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी होकार दर्शवत सांगितले की तालुक्यातून गट प्रमुख तथा संघटक म्हणून हरिभाऊ शेवाळे, नरेश सोळंकी, बाळासाहेब बागुल, अतुल खरे, रेखा गांगुर्डे, मंगेश बिरारी, अनिल सावंत, कुणाल अहिरे, विशाल नेरकर, दिपक सावंत आदींना घेण्यात आले. नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहर सावकार यांनी सांगितले की या अगोदर ज्या संघटनेत राहून आपण काम केले त्यात नक्कीच आपले हित जोपासले गेले नाही त्यामुळे आपण आता नव्याने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. यावेळी जिल्हा संघटक दादाजी अहिरे यांनी सांगितले की आपल्या तालुक्यातील आपल्या संघटनेत जेवढे कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा आपल्या तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे यांचे मार्फत काढून देण्यात येणार आहे ही आपल्यासाठी आनंदाची बातमी असून तालुक्याचे आमदार देखील कर्मचाऱ्यांसाठी झटत असल्याचे जिवंत उदाहरण आहे. यावेळी गोकुळ सोनवणे, विनोद गरुड, प्रल्हाद गांगुर्डे, गौतम गरुड, मच्छिंद्र खैरनार, समाधान गायकवाड, किरण देवरे, भाऊसाहेब खरे, विजय रौंदळ, भास्कर पवार, निलेश अहिरे, किरण पाटोळे, सुनील जगताप, अनिल वाघ, वाल्मीक हिरे, मयूर वाघ, दिनकर पवार, गोकुळ शिंदे आदींसह तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.