आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, वणी येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम मुख्याध्यापिका सोनाली काळे, शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी तेजश्री निर्मळ, दुर्वा भवर, विद्यार्थी संकेत ठाकरे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व व गुरूंचे आपल्या जीवनातील स्थान याविषयी अतिशय समर्पक शब्दांमध्ये माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर मुख्याध्यापिका काळे यांनी गुरुपौर्णिमा आपण का साजरी करतो महर्षी वेद व्यास यांविषयी माहिती, गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस या विषयांची स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना समर्पक शब्दांमध्ये दिले. त्यानंतर शालेय सर्व शिक्षकवृंदांचे विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील विद्यार्थिन श्रुती गायकवाड व गौरी गवळी यांनी केले होते.
दिगंबर पाटोळे वणी