विद्यार्थ्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहान प्रकरन:आरोपी पोलिस कोठडीत
धाराशिव :सचिन बिद्री
उमरगा तालुक्यातील कराळी येथील श्री आगजाप्पा देवस्थानात झोपलेल्या दोन विद्यार्थ्यांना गावातील गावगुंडांनी तलवारीचा व हंटरचा धाक दाखवून मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २७ जानेवारी रोजी रात्री घडली होती याबाबत उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.अखेर सदर गुन्ह्यातील फरार आरोपींना सात दिवसांच्या आत जेरबंद करण्यात उमरगा पोलिसांना यश आले आहे .अमोल भरत जाधव व नागराज बापू जमादार (दोघे रा.कराळी) या दोघांनी मिळून हातात तलवार व हंटर घेऊन श्री.सद्गुरू आगजाप्पा महाराज मंदिरात जाऊन मंदिरात असलेल्या अल्पवयीन आदित्य मंगेश वैष्णव व गौरव लक्ष्मण कदम यांच्या गळ्याला तलवार लावून जिवे मारण्याची धमकी दिली.तसेच आदित्य वैष्णव यास अमोल जमादार व नागराज जमादार यांनी खाली पाडून छातीवर बसून गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. लाउडस्पीकरवरून गावकऱ्यांना
शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी
देऊन मंदिराचा लोखंडी दरवाजा व आतील सामानाची नासधूस केली.
याशिवाय मठाधिपती तेजनाथ महाराज
यांनाही फोनवर शिवीगाळ करून जिवे
मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल
करण्यात आला होता; मात्र आरोपी भेटत नव्हते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासिक अधिकारी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले,सपोनि कन्हेरे,पोउपनि
पुजरवाड,पोहेकॉ कोनगुलवार,पोना कावळे,पोना यासिन सय्यद, पोकॉ भोरे यांनी कराळी पाटी तसेच तलमोड ते सोलापुर रोडवरील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले.अत्यंत सचोटीने व कौशल्यपुर्वक सर्व ठिकाणचे CCTV फुटेज पाहणी करून गुन्हयातील आरोपी नामे अमोल भरत जमादार, नागराज बापु जमादार यांचा त्यांचे राहते घरी कराळी, मुळज, तलमोड,धाकटीवाडी,थोरलीवाडी, हंद्राळ, कंटेकुर, कर्नाटकातील मनाळी बसवकल्याण या ठिकाणी जावुन शोध घेतला तसेच आरोपींचे मोबाईल नंबरचे सीडीआर टॉवर लोकेशनची माहीती घेतली असता आरोपीबाबत काहीच माहिती भेटत न्हवती. आरोपींचे मोबाईल बंद असल्यामुळे त्यांचे निश्चित लोकेशन मिळत नव्हते. गुन्हयातील आरोपीनी कराळी येथील आगजप्पा मंदिरात शिकण्यासाठी असलेले अल्पवयीन मुलावर हल्ला केलेला असल्याने व आरोपी हे मिळुन येत नसल्याने कराळी ग्रामस्थ हे संतप्त झाले होते. ते नांदोलनाचे तयारीत होते.व या प्रकरणावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस पथक रात्रं दिवस वेगवेगळ्या मार्गाने आरोपीतांचा शोध घेत असताना दि 6 फेब्रुवारी रोजी पोलिसांना गुप्त माहिती प्राप्त झाली त्यावर पोलिसांनी संधी न दवडता तात्काळ प्राप्त माहितीच्या आधारे कर्नाटक राज्यातील आळंद तालुक्यातील व्हनाळी येथे जावुन आरोपीना बेड्या ठोकल्या.आरोपी अमोल भरत जमादार (वय ३०) व नागराज बापू जमादार (वय २१) यांना ताब्यात घेऊन उमरगा पोलिस ठाण्यात आणले. न्यायालयाने त्यांना १३ फेब्रुवारीपर्यंत
पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
कस्टडीमध्ये आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली तलवार व हंटर जप्त करण्यात
आले आहे..