(धाराशिव प्रतिनिधी)
पहिली राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा दि २३ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे संपन्न झाल्या, यामध्ये एकूण १४ जिल्ह्यांतील जवळपास ४१० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेत मुरूम येथील गुरुकुल प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची गरुड भरारी घेत ६ पदकाची कमाई केली
यावेळी दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप लाड, सचिव बाला साठे, खजिनदार गौतम विधाते, सहसचिव अजय शहा , सहखजिनदार महमदरफी शेख, जेष्ठ वस्ताद आनंदराव ठोंबरे, शस्त्र व शास्त्र विशारद आणि लेखक वस्ताद विनायक चोपदार(आबाजी), वस्ताद मनोज बालिंगेकर.दांडपट्टा महाराष्ट्राचे सदस्य सौ दिपाली साठे, महागुरु सुभाष मोहिते, दांडपट्टा इंडियाचे अध्यक्ष संभाजी अहिरराव यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत उमरगा तालुक्यातील गुरुकुल प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल मुरूम,डॉ. रामानुजन इंग्लिश मीडियम स्कूल उमरगा,कुमार स्वामी विद्या मंदिर उमरगा,शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा,श्री महात्मा बसवेश्वर विद्यालय उमरगा,छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज उमरगा या शाळांनी सहभाग घेतला होता.
पहिली राज्यस्तरीय दांडपट्टा अंजिक्यपद क्रीडा स्पर्धेत टिम धाराशिवच्या वतीने मुलीमध्यें स्वरांजली मामले – प्रथम, स्वरा पाटील – प्रथम, पृतुषा प्रविण सोमवंशी – प्रथम, अनन्या मारूती पांगे – तृत्तीय, आरती दिगंबर पांगे – तृत्तीय, अक्षरा गुंडय्या स्वामी – तृत्तीय, समृद्धी संतोष टोपगे – द्वतीय, श्रेया जितेंद्र अंकुशे – तृत्तीय, मुलामंध्ये आयुष्य पवार – प्रथम, रोमन सैनी – द्वतीय, साहील शेख – प्रथम, करण जाणे – तृत्तीय, गोविंद रूपणूर – प्रथम, राजवीर चौधरी – द्वतीय, अभय मोरे – प्रथम यांनी सहभागी होऊन चांगली कामगिरी पार पाडली. जिल्हा संघटनेच्या वतीने यशस्वी अभिनंदन करण्यात आले व विद्यार्थ्यांचा पहिली राष्ट्रीय दांडपट्टा स्पर्धेत निवड झाल्याबद्दल जिल्हाभरातून कौतुक होत आहे.या स्पर्धा २१ व २२ एप्रिलम महिन्यात लोणावळा पुणे या ठिकाणी आयोजित होणार आहेत .
सर्व खेळाडूंचे गुरुकुल प्री प्राइमरी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापिका सौ मयुरी चौधरी व संस्थेचे सचिव आनंद चौधरी, डॉ. रामानुजन इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापिका गंगा अंबर, संस्थेचे अध्यक्ष महेश अंबर, मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे, कुमार स्वामी शाळेचे मुख्याध्यापक कविराज रेड्डी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल सर्व पालक वर्गातून कौतुक होत आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेच्या वतीने टेक्निकल विभाग प्रमुख आदिनाथ गोरे यांनी काम पाहिले.