प्रतिनिधी (आयुब शेख )
धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशानुसार नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांची बदली सायबर विभागाला तर त्यांच्या जागी नवीन सपोनि सचिन यादव यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिव जिल्हात सतत चर्चेत असलेल्या नळदुर्ग पोलिस ठाण्याचे
पोलिस निरीक्षक सचिन यादव यांनी पदभार स्विकारला आहे.
धडाकेबाज व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून यादव यांची ओळख आहे.
तसेच नळदुर्ग शहर हे एक संवेदनशील शहर म्हणून पोलिस दप्तरी नोंद आहे. या पोलिस ठाण्याचा कारभार गेल्या सहा महिन्यात काळात पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी सांभाळला होता. त्यांच्या जागी पोलिस निरीक्षक सचिन यादव रुजू झाले असून त्यांनी पदभार स्विकारला आहे. यापुर्वी ते सायबर गुन्हे शाखेत कार्यरत होते.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य राहील. गुन्हेगारीवृत्तीला आळा घालून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी प्रतिक्रिया सचिन यादव यांनी दिली.