DHARASHIV | ता.१९ कळंब तालुक्यातील चोराखळी येथील डिव्हीपी ग्रुपच्या धाराशिव साखर कारखान्याच्या दि.पिपल मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या येरमाळा शाखेचा शिवजयंती निमित्त शुभारंभ करण्यात आला. या शाखेमुळे परीरातील अनेक गावच्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांची सोय होणार आहे. येथे चोराखळी येथील धाराशिव कारखान्याच्या दि.पिपल मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या शाखेचा शुभारंभ येरमाळा येथे उत्साहात पार पडला.धाराशिव साखर कारखान्याचे येरमाळा परिसरातील वीस ते पंचवीस गावासह बार्शी,वाशी,कळंब तालुक्यातील हजारो ऊसउत्पादक सभासद असुन कारखाण्याला ऊस दिल्या नंतर कारखान्याचे ऊसबिल उचलन्यासाठी कारखान्यावर असलेल्या बँकेच्या शाखेत जावे लागत असे. शेतकरी सभासदांची होणारी गैर सोय पाहता डिव्हीपी ग्रुपचे संस्थापक,अध्यक्ष,धाराशिव करखान्याचे चेअरमन आमदार अभिजीत पाटील यांनी येरमाळा येथे डिव्हीपी ग्रुपची दि.पिपल ची शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे धाराशिव साखर कारखान्याच्या सभासदांची गैर सोय दुर होणार आहे. शिवाय येरमाळा हे गाव येडेश्वरी देवस्थान मुळे रहदारीचे गाव असल्याने व्यवसायिक दृष्ट्या प्रगत असल्याने व्यावसायिक आणि बँकेचा परस्परांना फायदा होणार आहे.
बुधवार (ता.१९) शिवजयंती निमित्त दि.पिपल मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या शाखेचा पोलीस स्टेशन समोरील सुनील पाटील यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये महापुजेने उत्साहात शुभारंभ करण्यात आला.या वेळी डिव्हिपी ग्रुपचे अर्जुन पाटील,प्रा.सुनील पाटील, जनरल मॅनेजर शशीकांत जगताप, विभागीय अधिकारी दत्ता देवडीकर,जनहितचे पतसंस्थेचे प्रा. संतोष तौर,येरमाळा पत्रकार संघांचे सचिव दत्ता बारकुल, पत्रकार,बालाजी रमेश बारकुल, तानाजी बारकुल,सुधीर लोमटे, दीपक बारकुल,वल्लभ माशाळकर, अंकुश पाटील, सतिष पाटील, पी.एम बारकुल,अनिल पाटील, अनिल बारकुल, यांच्यासह शाखेचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
येरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे)
