SAMBHAJINAGAR | गंगापूर दि. २७: अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी घरबसल्या काही मिनिटांतच आपली ई-केवायसी पूर्ण करू शकतात. राज्य सरकारने छखउ च्या सहकायनि लाभार्थ्यांच्या सोयीसाठी Mera E-KYC हे अॅप सुरू केले आहे. यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रास्त भाव दुकानावर न जाता घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करता बेईल.

मुख्य वैशिष्ट्ये घरबसल्या सोप्या पद्धतीने ई-केवायसी करा. फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी. रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही

सदस्य ई-केवायसी करू शकतो. आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक,

ई-केवायसी कशी करावी? (Step-by-Step मार्गदर्शन) आवश्यक अॅप डाउनलोड करा प्ले स्टोअरला मेरा ई केवायसी मोबाईल अॅप व आधार फेस आरडी सर्विसेस अॅप डाऊनलोड करावा अॅप इन्स्टॉल करून सेटअप करा

दोन्ही अॅप इन्स्टॉल करा आणि आवश्यक परवानग्या द्या.

मेरा एक केवायसी अॅप उघडा आणि पुढील स्टेप्स फॉलो करा यात राज्यः महाराष्ट्र निवडा. आधार क्रमांकः टाका आणि आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला ओटीपी

OTP प्रविष्ट करा. कॅप्चरः दिलेल्या कोडची नोंद करा.

व चेहर्याद्वारे पडताळणी करा (Face Authentication) स्वतःसाठी समोरचा कॅमेरा

सुरू करून चेहरा स्कॅन करा. दुसऱ्या व्यक्तीची केवायसी करत असल्यास बँक कैमेरा बापरा. स्क्रीनवर दिलेल्या सूचनांनुसार डोळ्यांची उघडझाप करा. सत्यापन पूर्ण होते यशस्वी पडताळणी झाल्यास, लाभार्थ्यांची माहिती रास्त भाव दुकानाच्या ई-पॉस मशीनवर दिसेल. याची खात्री करण्यासाठी पमध्ये E-KYC Status तपासा. जर E-KYC Status Y दिसत असेल, तर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही सेवा

फक्त महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी

उपलब्ध आहे. महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी IMPDS KYC पर्यायाचा उपयोग करावा. शेवटची तारीखः ३१ मार्च

२०२५ आहे (परंतु २८ फेब्रुवारी २०२५) पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावी. रास्त भाव दुकानदारांनी देखील शिधापत्रिकाधारकांना सहकार्य करून सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून कोणत्याही लाभार्थ्यांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागू नये. असे आवाहन तहसीलदार नवनाथ बगवाड पुरवठा अधिकारी कांचन कांबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *