आमदार प्रशांत बंब यांची मागणी
CHH. SAMBHAJINAGAR | गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे गंगापूर-खुलताबाद तालुक्यांतील गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या गंभीर स्वरूपात आहे. यामुळे या तालुक्यांतील पाणी टंचाई निवारणार्थ पाणी टँकर प्रस्तावांना मंजुरी देऊन भु-वैज्ञानिकांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी आ. प्रशांत बंब यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पञाद्वारे केली आहे. गंगापूर व खुलताबाद गटविकास अधिकारी यांनी त्यानुषंगाने पंचायत समिती कार्यालयाकडे पाणी टँकर उपलब्धतेबाबत प्रस्ताव दाखल केलेले आहे. परंतू या प्रस्तावांना मंजुरी अद्याप मिळालेली नसल्याने पुढील कार्यवाही प्रलंबित आहे. मतदारसंघातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता असून, नागरिकांना
प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर उपाययोजना म्हणून पाणी टँकर उपलब्ध करून देण्याची अत्यंत गरज आहे. तसेच गावांची स्थळ पाहणी करण्यासाठी मतदारसंघामध्ये भु-वैज्ञानिक उपलब्ध नसून, त्यांची देखील नियुक्ती होणे आवश्यक असल्याची पत्रात नमूद केले.