२५ मार्च रोजी गंगापूरला शांती मोर्चा
गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी बौद्ध भिख्खू बौद्धगया येथे आंदोलन करत आहे त्यांना समर्थन देण्यासाठी २५ मार्च रोजी गंगापूर शहारातील व तालुक्यातील बौध्द समाजाच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सकाळी ११ वाजता शांती मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार नवनाथ वगवाड यांना गंगापूर आंबेडकरी अनुयायांकडून देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बौध्द धर्मियांचे श्रध्दास्थान बुद्धगया येथिल महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. बुद्धगया येथे तथागत गौतम बौध्द ज्ञान प्राप्ती झाली आहे बौध्दांचे प्रतिक म्हणून महाबोधी विहार जगामध्ये ओळखले जाते.
हाबोधी विहार बौद्धांच्या
ताब्यात नसुन त्याठिकाणी पुरोहित कर्मकांड करत आहे. विहाराची कमेटी १९४९ ला जो कालबाह्या कायदा आहे त्या अनुषंगाने चालत आहे तो कायदा रद्द करून नविन कमेटी करून त्याकमेटीमध्ये सर्व भिक्खु संघाच्या सदस्यांचा समावेश करून बौद्धांचा ताब्यात देण्यात यावा असे निवेदनात नमूद
करण्यात आले आहे या निवेदनावर समाजसेवक बाबा भिवसने, संदिप खाजेकर, बापू खाजेकर आनंद भिवसाने, नारायण फुलारे राहुल कोळसे, राहुल सोनवणे, रमेश खाजेकर, किसन बर्वे, संघपाल जाधव, सुशील कुमार शिराळे, सुनयना शिराळे, अब्बू चाऊस, सुरेश शिंगारे, पोपट
खरात, अॅड सुनील गायकवाड, अॅड विजय खाजेकर, अॅड. सनी दळवी, अॅड प्रकाश जाधव, अॅड विशाल माघाडे, अॅड. राहुल माघाडे कैलास खाजेकर, संघपाल जाधव, कैलास साळवे, अमोल साळवे, बाबा भरपुरे, भगवान सुखदान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.