उपवनसंरक्षक,आलापल्ली यांना पाठविण्यात आले निवेदन

चामोर्शी तालुक्यातील गणपूर रैयत्तवारी, मुधोली रिठ, जयरामपूर, लक्ष्मणपूर, विठ्ठलपूर हळदी चक, हळदी माल व अड्याळ या गावालगत असलेल्या शेतशिवारा मध्ये वाघाचा वावर असल्याने मौजा गणपूर रैयत्तवारी येथील शेतकरी संतोष भाउजी राऊत यांना ०१ मार्चला ला जीव गमवावा लागला असल्याने वन्यप्राणी वाधाचा वावर असून दिवसेदिवस या क्षेत्रामध्ये पशुहानी, मनुष्यहानी या प्रकरणाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे सदर क्षेत्रामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्यास्थितीत शेतात मक्का, भात व इतर उभे पिक असून भीतीच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचण होत असल्यामुळे स्थानिकांचे जीवित, आर्थिक नुकसान होत आहे. करीता चार दिवसात वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा. चार दिवसात सदर हिस्त्र वन्यप्राण्याचे बंदोबस्त न केल्यास गणपूर रैयत्तवारी परिसरातील जनतेने मोठा आंदोलन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. असे गणपूर परिसरातील शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मार्कंडा कंन्सोबा यांच्या मार्फत उपवनसंरक्षक आलापल्ली यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना निलकंठ निखाडे सरपंच सोमनपली, सुधाकर गद्दे सरपंच गणपूर रैयत्तवारी, जीवनदास भोयर उपसरपंच गणपुर रैयत्तवारी, अश्विनी कुमरे सरपंच मुधोली चक नं. 2, मंगलदास आत्राम सरपंच मुधोली रिठ, यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

भास्कर फरकडे रिपोर्टर एन टिव्ही न्युज मराठी गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *