या हल्याने परिसरात दहशत

चामोर्शी : तालुक्यातील वनपरिक्षेत्र मार्कंडा कंन्सोबा अंतर्गत येत असलेल्या गणपूर येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 1 मार्चला रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. संतोष भाऊजी राऊत वय 45 वर्ष रा. गणपूर तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात मृत शेतकऱ्याचे नाव आहे.


संतोष राऊत हे आपल्या शेतात कामासाठी गेले होते. मात्र ते संध्याकाळी उशिरापर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यासाठी शेतशिवारात गेले असता संतोष चा मृतदेह शेत शिवारालगत सापडला त्यांच्या पायाचा एक लचका तुटल्या अवस्थेत होता. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असुन पंचनामा करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरु होती. मृत संतोष हा मनमिळावु स्वभावाचे म्हणून परिचित होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी असा आप्त परिवार असुन गणपूर परीसरात वाघाच्या या हल्ल्याने परिसरातील नागरीक दहशतीत आहे.

भास्कर फरकडे रिपोर्टर एन टिव्ही न्युज मराठी गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *