सेनगाव तालुक्यात अवैध रेती उपसा करून रेती माफीयांनी कहर केला आहे. अवैध रेती उपसा व वाहतूक तात्काळ बंद करा नसता सेनगाव महसूल प्रशासनाच्या विरोधात ढोल बजाव आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी निवेदन देत इशारा दिला आहे.

सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून अवैध रेती माफिया मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी रेती उपसा करुन आव्वाच्यासव्वा भावात विक्री करीत आहे. चोरटी रेतीची वाहतूक होत असल्याने महसूल प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.सध्या सेनगाव तालुक्यातील ब्रह्मवाडी, चिखलाकर, हुडी लिंबाळा, बन, बरडा आधी ठिकाणावर रात्रीच्या सुमारास नदीपात्रातील रेती उपसा चालत असून या रात्रीस खेळ चाले या खेळाला जबाबदार आका कोण असा सवाल देखील उपस्थित होत आहे तर प्रशासनाचे अधिकारी या वाळुमाफीयावर कारवाई का करीत नाही दालमे कुछ काला है अंशी परीस्थिती आहे.सध्या सेनगाव तालुक्यात केंद्र व राज्य शासनाकडून गोरगरिबांना घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले आहेत एकीकडे घरकुलची कामे होत असताना रेतीची मागणी वाढली आहे याचाचा फायदा घेत रेतीमाफीया रात्रीच्या वेळी रेतीची वाहतुक सुरू आहे यातुन रेती माफीया लाखो रुपये कमवित आहेत एकीकडे राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार घरकुल लाभार्थ्यांना दोन ब्रास मोफत वाळू देण्याचे धोरण असून सुद्धा घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून मोफत वाळू मिळतच नसून त्याचा मोबदला पण मिळत नाही.अवैध रेतीमाफीकडून दोन ब्रास रेतीसाठी पंधरा हजार रुपये घेतल्या जात असून सर्वसामान्यांना हा भाव परवडणारा नसल्याने अनेक घरकुल लाभार्थ्यांनी घर बांधकाम बंद आहे रात्रीच्या वेळी सेनगाव तालुक्यातील रेती माफियांच्या 30 ते 40 गाडी द्वारे अवैध रेती उपसा होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली असून महसूल प्रशासन सह पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करीत आहे असा आरोप नागरिकांतून होत आहे तर तालुक्यात होणाऱ्या अवैध रेती उपसा तात्काळ थांबवावा नसता ठाकरे शिवसेना स्टाईल महसूल प्रशासनाच्या कार्यालया समोर निष्क्रिय प्रशासनाच्या निषेधार्थ ढोल बजाओ आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी आज नायबतहसीलदार देवराव कारगुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख तालुकाप्रमुख संतोष देवकर शहर प्रमुख जगन्नाथ देशमुख तालुका संघटक प्रवीण महाजन युवा सेना तालुकाप्रमुख जगदीश पाटील नगरसेवक वैभव देशमुख प्रशांत देशमुख विलास सुतार करण देशमुख अमर देशमुख गोपाल देशमुख भैया जाधव गणेश रंजवे पांडुरंग देशमुख बबलू देशमुख यासह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले आहे
