महाराष्ट्र सरकारच्या ” व्हॅट टॅक्स धोरणाचा जाहीर निषेध F एफ तेरा (परमिट रुम/बिअरबार) मधील मद्य विक्रीवर महाराष्ट्र शासनाने व्हॅट च्या नावाखाली लादलेला 10 टक्के टर्न ओव्हर टॅक्स आणि दरवर्षी भरमसाठ होणारी परवाना नूतनीकरण फी रद्द करणे तसेच मद्यविक्रीतून शासनाचा महसूल वाढण्यासाठी मद्य निर्मितीवर FIRST POINT TAX लागू करण्याच्या आग्रही मागणीसाठी
मद्यविक्री बंद आंदोलन गुरुवार, दि. २० मार्च २०२५ रोजी करण्यात आले आहे .
या बाबत आज वसमत तालुक्यातील सर्व वाईनबार असोसिएशन ची बैठक शासकीय विश्रामगृह वसमत येथे घेण्यात आली.
कुठल्याही करवाढीचा फटका ग्राहकालाच होत असतो. आपणही शासनाला जागे करण्यासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने सामील व्हा ! आसे आवाहन वसमत तालुका वाईन बार असोसिएशन चा वतीने करण्यात आले आहे.
या बैठकीत सर्व वसमत तालुक्यातील सर्व वाईनबार दि.20 मार्च रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता
या बैठकीस वसमत तालुका वाईन बार असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली 98 50561850