शेतकऱ्यांना केद्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रिस्टॅक’ नावाची प्रणाली सुरू केली आहे.गोरेगाव येथे ॲग्री स्टॅक कॅम्पसमध्ये शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक कार्ड आणि त्यातुन मिळणारे योजनेचा लाभ यासाठी कॅम्पमध्ये कृषी विभाग आणि महसूल विभागाकडुन मार्गदर्शन करण्यात आले.

केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातही ‘ॲग्रिस्ट्रॅक’ उपक्रमाला सुरुवात झाली असुन केंद्र आणि राज्य सरकार कडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी
ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी काढण्यासाठी गोरेगाव येथे दि 30 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महसूल आणि वनविभाग मा.उपविभागीय अधिकारी हिंगोली व मा तहसील सेनगाव यांच्या मार्गदर्शनाखाली
ॲग्री स्टॅक कॅम्पचे आयोजित करण्यात आले होते

यावेळीआलेल्या सर्व शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅक,फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी मार्गदर्शन व याचे फायदे समजावून सांगितले या कार्ड मध्ये शेतकरी व त्यांच्या जमिनी, शेतात घेतलेली हंगामी पिके आणि त्यांच्या शेताचे भौगोलिक स्थान ही माहिती एकत्रित घेतली जात आहे. या पारदर्शक प्रणालीद्वारे शेतकऱ्यांची ओळख (फार्मर आयडी) निश्चित केली जाते.
या प्रणालीचा लाभ शेतकऱ्यांना शासनाच्या आर्थिक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी करण्यात येणार आहे
तरी सर्व शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅक फार्मर आयडीसाठी आपल्या CSC केंद्रावर अगदी मोफत काढुन घ्यावे असे आवाहन कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे गोरेगाव येथील आयोजित ॲग्री स्टॅक फार्मर आय डी कॅम्प मध्ये मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते यावेळी गोरेगाव येथील महिला सरपंच गंगुबाई कावरखे, उपसरपंच विश्वनाथ कावरखे, ग्रामसेवक गोरडे साहेब, गोरेगाव मंडळ अधिकारी कल्पना साळवे,गोरेगाव येथील
तलाठी पि.डी.ईगोले.
ग्राम महसूल अधिकारी रवी इंगोले, नामदेव ढोले,रणजित देशमुख,वसंत जाधव ,प्रदीप इंगोले. कृषी विभागाचे कृषी प्रवेशक सोनवणे, कृषी सहाय्यक ताटे , अनिल खिल्लारे ,प्रमोद खिल्लारी ,जगताप साहेब, मंडळकृषी अधिकारी गोरेगाव आर यस भिसे,CSC केंद्र चालक राजु कावरखे, यांच्यासह कृषी आणि महसुल विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या ॲग्री स्टॅक कॅम्पमध्ये शेतकरी आदी उपस्थित होते.
