परम पूज्य श्री संतोष महाराज यांचा वाढदिवस .

परमपूज्य शेषराव महाराज मूर्ती स्थापना व वर्धापन दिन तसेच व्यसनमुक्त झालेल्या नागरिकांचा भव्य सत्कार .

वसमत तालुक्यातील आरळ या ठिकाणी अन्नपूर्णा प्रॉडक्ट हळद मसाला उद्योग आरळ तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी परमपूज्य श्री संतोष महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त दारू व्यसनमुक्त नागरिकांचा भव्य सत्कार सोहळा व शेषराव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन साजरा होणार आहे .

कोट्यावधी लोकांना दारूच्या जीवघेण्या व्यसनातून मुक्त करून संसार सुखी व आनंदी करणारे व्यसनमुक्तीचे देवदूत परमपूज्य श्री शेषराव महाराज शिरपूर तालुका जिल्हा बुलढाणा यांचे उत्तर अधिकारी परमपूज्य श्री संतोष महाराज यांच्या 44 व्या वाढदिवसानिमित्त व्यसनमुक्त झालेल्या नागरिकांचा व व्यसनमुक्ती कार्यकर्त्यांचा भव्य सत्कार सोहळा परमपूज्य श्री शेषराव महाराज मूर्ती स्थापना वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे .

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शहाजी उमाप साहेब पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांच्या शुभहस्ते व्यसनमुक्ती नागरिकांचा सत्कार व मार्गदर्शन होणार आहे .

यावेळी राजकुमार केंद्रे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी, शारदा दळवी मॅडम तहसीलदार वसमत, संग्राम जाधव पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हट्टा, ताटेवार सर योग शिक्षक वसमत ,सुधीर वाघ साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वसमत शहर ,मारुती कॅतमवार साहेब डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष ,गोरख पाटील कार्यकर्ता शेतकरी संघटना, प्रकाश पवार सर सेवानिवृत्त शिक्षक, गजानन बोराटे पोलीस सहनिरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन वसमत ,डॉक्टर बालासाहेब शेलुकर शिवम हॉस्पिटल वसमत, गंगाधर काळे वैद्यकीय अधिकारी ,अनंतराव राठोड जगदंबा ट्रान्सपोर्ट वसमत, डॉक्टर बालाजी कराळे नागनाथ काळे नेत्ररोग तज्ञ, एडवोकेट प्रदीप अग्रवाल, राजकुमार एंगडे सामाजिक कार्यकर्ते ,गणेश दासरे, आदी सर्व मान्यवर या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत .

या कार्यक्रमाचे आयोजक व विनीत अन्नपूर्णा जनकल्याण प्रतिष्ठान आरळ अध्यक्ष दासराव कातोरे सेवक मार्गदर्शक व्यसनमुक्ती संघटना जिल्हा हिंगोली व सर्व कार्यकर्ते .

व्यसनातून मुक्त होणे हाच मनुष्याचा पुनर्जन्म आहे असे परमपूज्य श्री शेषराव महाराज नेहमी सांगत असत .

हा कार्यक्रम आरळ या ठिकाणी 18 . 5 .2025 दुपारी चार वाजता अन्नपूर्णा फूड प्रॉडक्ट हळद व मसाला उद्योग तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी पार पडणार आहे .

व्यसनमुक्ती कार्यकर्ते बाबुराव जाबुदकर जिल्हाध्यक्ष, पुंडलिक महाराज शेळके, शिवाजी रिठे, दिगंबर जाधव ,श्रावण सुरोशे, प्रा नंदकुमार सवंडकर, सुरेश सवंडकर, आबासाहेब सवंडकर, ज्ञानेश्वर सोळंके, नारायणराव कदम लोळेश्वर, सुरेश खराटे, विश्वनाथ खराटे, रुस्तुम सोळंके ,नामदेव गोरे, आरडी मेहेत्रे , कल्याणराव पार्डीकर ,शरीफ बागवान, विठ्ठल सावजी, सुरेश राऊत, अण्णासाहेब कानोडे ,व सर्व व्यसनमुक्ती कार्यकर्ते यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे .

या सामाजिक कार्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष दसरा व कातोरे यांनी केले आहे .

प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली 98 50

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *