BULDHANA |  जमीन वारस प्रकरणात सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिंदखेड राजा तहसील कार्यालयातील लिपिक आणि तलाठ्यास बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल सायंकाळी रंगेहाथ अटक केली. खामगाव खापरखुटी येथील सज्जाचे तलाठी रावसाहेब काकडे यांच्याकडे सातबाऱ्यावर वारस चढविण्याचे प्रकरण प्रलंबित होते. संबंधित तक्रारदार हा मालक असून, तलाठी काकडे आणि तहसील कार्यालयातील वर्ग एक लिपिक मनोज झिने यांच्यात आर्थिक देवाण-घेवाणीमुळे हे प्रकरण रखडल्याचे होते. जमिनी संदर्भातील सर्व आवश्यक दस्तऐवज उपलब्ध असतानाही, केवळ आर्थिक लाभाच्या उद्देशाने काम प्रलंबित ठेवले जात होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या मालकाने या प्रकरणात बुलढाणा लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. काल सायंकाळी एसीबीचे पोलिस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या नेतृत्वाखाली एसीबीच्या पथकाने सापळा रचून तहसील कार्यालयाच्या मागे ठरलेली 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक मनोज झिने आणि तलाठी काकडे यांना रंगेहाथ पकडले. प्राथमिक चौकशी, पंचनामा पूर्ण करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *