
शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचलित डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात 22 जुलै ते 28 जुलै शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार शिक्षण सप्ताह विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले यामध्ये शैक्षणिक साहित्य निर्मिती क्रीडा स्पर्धा वृक्षारोपण वृक्ष लागवडीचे महत्त्व गणितीय खेळ सांस्कृतिक उपक्रम वेशभूषा कौशल्य व डिजिटल उपक्रम मिशन लाईफ इको क्लब विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभागी होऊन विद्यालयात सर्व शिक्षक वृंदांनी अथक परिश्रम घेऊन शिक्षण सप्ताह साजरा केला दिनांक 28 जुलै रोजी शिक्षण सप्ताहाची सांगता करण्यात आली

गजानन नरवाडे
मेहकर बुलडाणा