MSRTC BUS | राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) तब्बल २ हजार जुन्या बसेस आता भंगारात काढण्यात येणार आहेत. धातू भंगार व्यापार महामंडळ (एमएसटीसी) यांच्या माध्यमातून या बसेसचा लिलाव होणार आहे. राज्यातील ३२ आगारांमध्ये सध्या या बसेस उभ्या आहेत आणि त्या मुंबईत उच्च बोली लावणाऱ्याला विकल्या जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सध्या एसटी महामंडळाकडे सुमारे १४ हजार बसेस आहेत. मात्र, वयोमर्यादेनुसार जुन्या झालेल्या बसेस टप्प्याटप्प्याने भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरवर्षी सुमारे २ हजार बसेस भंगारात काढल्या जातात. येत्या दोन ते तीन वर्षांत आणखी सुमारे ५ हजार बसेस भंगारात जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या लिलावात प्रत्येकी २ ते २.५ लाख रुपयांचा महसूल महामंडळाला मिळाल्याची माहिती आहे.
#STBus #MaharashtraTransport #ntvnews #ScrapBuses #BusAuction #MSTC #ntvnewsmarathi