एन टी व्ही वर्धापन दिनाची प्रतिक्षा संपली येत्या पुढील आठवडयात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित होणार वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा
महाराष्ट्र राज्यातील आघाडीची वृत्त वाहीनी म्हणुन नावाजलेल्या एन् टी व्ही न्युज मराठी महाराष्ट्र या वृत्त वाहीनीचा 23 वा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा येत्या काही दिवसात महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती तथा मुख्य मंत्री देवेद्र फडणवीस यांचे विश्वासु सहकारी मित्र ना राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित व इतर अनेक मान्यवर मंत्री खासदार आमदार व प्रमुख पत्रकार यांच्या साक्षिने हा दिमाखदार सोहळा अहमदनगर येथील व्ही स्टार या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये संपन्न होणार आहे या संदर्भात एन टी व्ही न्युज मराठी या वृत्त वाहीनीचे मुख्य संपादक मा इकबाल शेख सर यांनी सभापती महोदय राम शिंदे यांची रवीवार दि 20 जुलै रोजी सायं 6 वाजता त्यांच्या चोंडी येथील निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांना या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या निमंत्रणा साठी निमंत्रण देऊन साकडे घातले सभापती महोदय राम शिंदे साहेब यांनी निमंत्रण स्विकारून कार्यक्रमास उपस्थित रहाण्यास होकार दिला असुन लवकरच त्यांच्या वेळेनुसार दिवस व तारीख निश्चीत होणार असल्याने आता वर्धापन दिन व पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाची प्रतिक्षा संपली असुन लवकरच हा भव्य दिव्य कार्यक्रम साजरा होणार असल्याचे एन् टी व्ही न्युज संपादक इकबाल शेख सर यांनी स्पष्ट केले असुन आता राज्यातील सर्व प्रतिनिधी मान्यवर आणि सर्व न्युज टीमच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सर्व प्रतिनिधी नी आपल्या कामास जोमाने लागुन जास्तीत जास्त जाहिरात सहकार्य करावे आणि आपला वर्धापन दिनाचा आनंद या पेक्षाही जास्त द्वीगुणी त करावा असे आव्हाहन करण्यात येत आहे