प्रा. सुनील पंडित व भीमराज ग्रुप मेहेकरी यांचा सामाजिक उपक्रम”
अहिल्यानगर:-
संजीवनी मेडिकल ट्रेनिंग सेंटर संचलित श्री वीरभद्र प्राथमिक आश्रमशाळा बारादरी येथे प्रा. सुनील पंडित (फार्मा पीएचडी) व भीमराज ग्रुप मेहेकरी यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर आरो प्लांट देण्यात आला तसेच सर्व मुलांना खाऊवाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी ठकसेन पंडित व शशिकांत पंडित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश शिंदे, अधीक्षक डोळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक डोळे सर यांनी केले. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिली व पिण्याच्या पाण्यासाठी मदत केल्याबद्दल सुनील पंडित यांचे आभार मानले.
मुख्याध्यापक प्रकाश शिंदे सर यांनी सामाजिक भान जपत शैक्षणिक कार्यात योगदान देणाऱ्या सुनील पंडित व भीमराज ग्रुपचे अभिनंदन केले. शशिकांत पंडित यांनी सुनील पंडित यांचे कौतुक करताना त्यांचा हा उपक्रम समाजासाठी आदर्श असल्याचे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष मिलिंद फुंदे सर यांनीही पंडित सरांच्या कार्याची प्रशंसा करत, भीमराज ग्रुपच्या विविध सामाजिक उपक्रमांचा उल्लेख केला व प्रेरणादायी कार्य म्हणून गौरव केला.
सुनील पंडित यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “माझ्या सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबवला असून, गरजूंना मदत करण्याचा खरा आनंद मला अशा कार्यातून मिळतो. विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावा.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष गर्जे सर यांनी केले. यावेळी चौधरी सर, आंधळे सर व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्या नगर
मो नं 9765886124