(धाराशिव)
पुणे येथील एम.बी.माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन कंपनी च्या अध्यक्ष पदी उमरगा तालुक्यातील आष्टा जहांगीर येथील रहिवासी तथा पुणे येथे स्थायिक झालेले रघुराम गायकवाड यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
उमरगा तालुक्यातील आष्टा जहागीर येथील रहिवासी रघुराम गायकवाड यांची एम.बी.ए .माथाडी ट्रांन्सपोर्ट व जनरल कामगार युनियन कंपनी जनरल कामगार पुणे च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी निवड घोषित करून निवडीचे पत्र देण्यात आले आहे. ते सध्या पुणे येथे स्थायिक झालेले आहेत.
या निवडीचे महत्त्व कामगार संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, व कंपणी कामगार तसेच महिलांच्या विविध प्रलंबीत मागण्या बाबत अवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे. हा उद्देश असल्याचे नियुक्ती पत्राद्वारे नमुद करण्यात आले आहे.
सदरची नियुक्ती एम.बी.ए.माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या संस्थापक अध्यक्ष मंगला भंडारी यांनी केली आहे.
या निवडीबद्दल रघुराम गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.