येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे) –
कळंब तालुक्यातील शेलगाव (दि.) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे ज्ञानेश्वर गोपीनाथ सुरवसे यांचा मुलगा विवेक यांची भारत सरकारच्या न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली असून त्यांचे नियुक्ती पत्र नुकतेच प्राप्त झाला आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. विवेक चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. तर माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय मुरुड येथे झाले आहे.

सुरूवातीपासूनच अभ्यासात कायम अग्रस्थानी असणाऱ्या विवेकने दहावीत शंभर टक्के गुण घेऊन आपली भविष्यातील दिशा दाखवून दिली होती. आणि तेव्हा पासूनच शास्त्रज्ञ होण्याचे त्यांचे स्वप्न होते. लातूर येथील नामांकित राजर्षी शाहू महाविद्यालयातून आयआयटी जेईई तयारी करून भारतातील अव्वल असणाऱ्या आयआयटी मद्रास (चेन्नई) तामिळनाडू येथून B. Tech. (इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग) प्रथम श्रेणीत पुर्ण केले. GATE परीक्षा 2025 यशस्वी होवून या द्वारे वैज्ञानिक क्षेत्रात पदार्पण केले. विवेकने लहाणपणापासून बाळगलेल स्वप्न साकार होत असताना या पर्यंतच्या प्रवासात वडिलांबरोबर आईचे कष्ट अधिक मोलाचे ठरले आहे. त्यामुळे विवेकचे वडील विवेकच्या यशाचे श्रेय त्याच्या आईला व मार्गदर्शक सर्व शिक्षक यांना देतात. विवेकच्या या यशाबद्दल सर्व संबंधित शिक्षक, तसेच नेहमी मार्गदर्शन करणारे धर्मराज काळमाते, गटशिक्षणाधिकारी कळंब, व विविध अधिकारी आणि सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सामान्य शिक्षकाच्या मुलाने मिळवलेले यश आदर्शवत असून त्याबद्दल विवेक बरोबर त्याच्या आई वडिलाचे देखिल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.