DHARASHIV | १९ जुलै २०२५ रोजी, धाराशिव जिल्हा प्रशासनाने “हरित धाराशिव अभियान” या बॅनरखाली एकाच दिवसात २० लाख झाडे लावण्याच्या धाडसी आणि ऐतिहासिक हरित मोहिमेसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडे अधिकृतपणे अर्ज केला आहे.

ही केवळ वृक्षारोपण मोहीम नाही तर अभिमानाचा क्षण आहे, धाराशिवची एक नवीन ओळख निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. निवडणूक कर्तव्यादरम्यान आपण दाखवतो त्याच समर्पणाने, उर्जेने आणि टीमवर्कने आपण याकडे जाऊया.

या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी लवकरच जिल्हास्तरीय समन्वय बैठक आणि व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली जाईल. तुमच्या पूर्ण पाठिंब्यावर आणि उत्साही सहभागावर आम्हाला विश्वास आहे — चला एकत्र इतिहास घडवूया

धाराशिव जिल्ह्यात असलेला ओसाड माळरान यामधील अंतर डोळ्यात सतावू लागले आणि मग काय साक्षात जिल्हाधिकाऱ्यांनी दिवस व रात्र एक करून एकाच दिवसात लाखो वृक्ष लागवडीचा संकल्प केला….

जसा कोकण झाडाझुडपांनी नटलेला डोंगर रस्त्याच्या कडेला सळसळणारी हिरवळ आणि निसर्गाचा समृद्ध वारसा आहे अगदी तसाच धाराशिव जिल्हा ही हरित स्वच्छ आणि निसर्ग संपन्न बनविण्यासाठी त्यांनी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आणि या मोहिमेची एवढी जोरात तयारी झाली की त्या मोहिमेसाठी व होणाऱ्या कार्यक्रमाची दखल घेण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांची सुद्धा टीम धाराशिव जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाच्या दिवशी हजर राहून एकाच दिवसात लाखो वृक्ष लागवड कशी केली जाते याची नोंद घेण्यासाठी दाखल होणार असून या वृक्ष लागवडीसाठी प्रथमच जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यातील वन विभाग सोडून इतर सर्व विभागांना वृक्ष लागवड व संवर्धन करणे हे बंधनकारक करण्यात आले असून आज पर्यंत वृक्ष लागवड हा कार्यक्रम फक्त वन विभाग करत होते परंतु प्रथमच जिल्ह्याच्या इतिहासात जिल्हाधिकारी साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीची महत्त्वकांक्षा उराशी बाळगून आहेत व ती सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असून आज त्यांनी धाराशिव पासून अगदी जवळच असलेल्या शिंगोली येथील फॉरेस्ट ला भेट देऊन प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन वृक्ष लागवडीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या तसेच वृक्ष लागवड ही यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच विभागाने प्रयत्न करण्यासाठी योग्य त्या सूचनाही दिल्या….

जिल्ह्याच्या आज पर्यंतच्या वृक्ष लागवडीच्या इतिहासातही पहिल्यांदाच नोंद घ्यावी अशी घटना घडणार आहे ती म्हणजे वन विभाग सोडून इतरही विभाग वृक्ष लागवडीसाठी यावेळी जिल्हाधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन सरसावले आहेत वृक्ष लागवड करण्यासाठी कृषी विभाग शिक्षण विभाग बांधकाम विभाग तसेच महसूल प्रशासनातील व सामान्य प्रशासनातील सर्वच विभागांना योग्य त्या जिम्मेदारी दिल्या असून त्या पार पाडण्यासाठी ही जिल्हाधिकारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले

यावेळेस उपस्थित वन विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते..

प्रतिनिधी आयुब शेख धाराशिव,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *