एटापल्ली: येत्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला एटापल्ली येथील भगवंतराव अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी एक अनोखा उपक्रम राबवला. त्यांनी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी श्री. नमन गोयल यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
यावेळी विद्यार्थिनींनी श्री. गोयल यांच्याबद्दल आपले प्रेम आणि आदर व्यक्त केला. श्री. गोयल यांनीही कमी वेळात आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण केला असून, ते विद्यार्थ्यांना अगदी आपल्या घरातीलच सदस्य वाटतात, असे विद्यार्थिनींनी सांगितले.

यावेळी श्री. गोयल यांनी विद्यार्थिनींशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या शिक्षणातील अडचणी, भविष्यातील शैक्षणिक योजना आणि इतर गोष्टींबद्दल त्यांनी विचारपूस केली. त्यांच्या या भेटीमुळे विद्यार्थिनींना एक नवी ऊर्जा मिळाली आहे.
प्रतिनिधी: शंकर मुल्येलवार एन टीव्ही न्यूज मराठी