♦️N Tv News: अकोले अपडेट
स्वातंत्र्यदिनी भंडारदरा धरण परिसरात भटकंती करण्यासाठी पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात. यंदाही संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेशात म्हटले की १५ ऑगस्ट २०२५ ते १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. यानुसार रंधा फाटा येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा येथून प्रवेश असेल. एकेरी वाहतुकीचा मार्ग वारंघुशी फाटा, वाकी फाटा, चिचोंडी फाटा, यश रिसोर्ट शेंडी, भंडारदरा धरण स्पिल्वे गेट, भंडारदरा गाव – गुहिरे, रंधा मार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे. यातून फक्त अत्यावश्यक सेवा रुग्णवाहिका, अग्निशामक दल, शासकीय वाहने यांना वगळण्यात आले आहे.
N Tv News Marathi🎥📷 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा : 9028903896