
गोंदिया:
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलिसांनी एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवला. त्यांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले तब्बल २० मोबाईल शोधून काढले आणि ते त्यांच्या मूळ मालकांना परत केले. या उपक्रमाने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
हे मोबाईल उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या हस्ते मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त एक “अनमोल भेट” मिळाल्याचा आनंद झाला. पोलिस निरीक्षक भूषण बुराडे, नाईक विनोद जांभुळकर, शिपाई दिनेश गावंडे आणि विजयराज खुरुल यांच्या विशेष योगदानामुळे ही मोहीम यशस्वी झाली.
पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे समाजातील त्यांच्या सकारात्मक प्रतिमेला आणखी बळकटी मिळाली आहे. नागरिकांचे हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पोलिसांच्या या प्रयत्नांची साक्ष देत होता.
प्रतिनिधी राधाकिसन चुटे,
एनटीव्ही न्यूज मराठी, गोंदिया.