गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी शेत-शिवारातील घटना…. मृतक महिलेच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केल्याच्या खुणा… डूग्गीपार पोलिसांकडून महिलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू…

गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी शेत-शिवारामध्ये एका 25 ते 30 वर्षे वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आज सकाळी आढळून आला… खजरी येथील शेतकरी पहाटे आपल्या शेतात गेले असता महिलेचा मृतदेह त्यांना दिसला.. शेतकऱ्याने घटनेची माहिती डूग्गीपार पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून महिलेची ओळख पटविण्याकरिता पोलीस प्रयत्न करत आहेत…
राधाकिसन चुटे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया