हिंगोली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमीत्त आयोजित करण्यात आलेल्या 14 वी सबज्युनिअर राज्यस्तरीय नेटबॉल क्रीडा स्पर्धा ही दि.26 ते 28 नोव्हेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल लिबांळा मुक्ता हिंगोली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. नेटबॉल क्रीडा स्पर्धा हौशी नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातुन मुलांचे 20 तर मुलिंचे 15 संघानी सहभाग नोंदविला होता.या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेत सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील श्री.रमतेराम महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रोत्साहन बक्षीस मिळवले बक्षीस वितरण समारंभा वेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामरावजी वडकुते, डॉ रवि पाटील गोरेगावकर, नारायण खेडकर,के.के.शिंदे, विठ्ठलराव मुटकुळे,सरद स्पर्धा हिंगोली जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे हिंगोली अध्यक्ष तथा(रमतेराम महाराज विश्वविद्याल मुख्याध्यापक)श्री शिवाजीराव घुगरे, सचिव विठ्ठल महाले, आयोजन समिति अध्यक्ष डॉ रवि पाटील,तसेच रमतेराम महाराज विद्यालय कडोळी,व अमृतराव कनिष्ठ महाविद्यालय पानकनेरगाव शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती.