सरपंच सोनिताई किरमे यांचे हस्ते विध्यार्थ्यांचा सत्कार
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा घेण्यात आलेल्या सण २०२०-२१ मधील शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाघोली येथील दोन विध्यार्थी अनुक्रमे १.अनुग्रहा अजीत उराडे व २.रोशन जागेश्वर दुर्गे पात्र झाल्यामुळे विध्यार्थी व पालकात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोनिताई प्रमोदराव किरमे सरपंच ग्रामपंचायत वाघोली यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष योगेश किरमे, उपाध्यक्ष संदीप गेडाम, सदस्य शेषराव पाल, हेमंत पाल , देवानंद जुवारे व प्रतिष्ठित नागरिक सत्यवान उराडे, अंकुश पोरटे,ढिवरू दुर्गे आदी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम पिपरे, वर्गशिक्षक चंदू चहारे, व शाळेतील शिक्षक महादेव पाल, सुधीर भैसारे,बंडू राठोड, प्रिती कडाम यांना व आपल्या आई -वडीलांना दिले आहे. केंद्राचे केंद्रप्रमुख पंचफुलीवार सर व केंद्रातील सर्व शिक्षक यांचेकडून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
भास्कर फरकडे चामोर्शी एन.टिव्ही न्यूज मराठी