सरपंच ग्रामसेवक यांनी फर्निचर न आणता परस्पर निधी उचलला

चौकशी करण्याची ग्रामपंचायत सदस्याची तक्रार.

हिंगोली : गावातील सर्व नागरिकांनी गावचा विकास होऊन मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी गावातील नागरीक लोकप्रतिनिधी यांना निवडुन देतात परंतु निवडुन आल्यावर अनेक लोकप्रतिनिधी निवडणुक पुर्वी दिलेली आश्वासने विसरून मनमानी कारभारामुळे अनेक गावागावांत विकास फक्त कागदावरच असतो निधी उपलब्ध झाला की सरपंच, ग्रामसेवक आपल्या सोबत असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना बगल देऊन निधी परस्पर उचलुन घेतात असाच एक प्रकार सेनगाव तालुक्यातील मौजे खैरखेडा येथे उघडकीस आला आहे.

खैरखेडा ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये 14 वित्त आयोगाकडुन आलेला निधी फर्निचर खरेदी साठी उचलला गेला परंतु प्रत्यक्षात मात्र फर्निचर खरेदी केला नसुन निधी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी हडप केला असल्याची तक्रार खुद ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी याना केली आहे.निवेदनात खैरखेडा ग्रामपंचायत कार्यालयाला विकासकामांसाठी आलेले निधी कामे न करता परस्पर उचलुन घेतला असल्याचे ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले असुन याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.सेनगाव तालुक्यातील अनेक गावात हिच परिस्थिती असल्याचे सुज्ञ नागरीकातुन बोललं जातं आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *