औरंगाबाद : सिरहिंद, जिल्हा फतेहगढ साहिब पंजाब येथील सीरहिंद जिल्हा फतेहगढ येथे नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन आले होते.
या स्पर्धेत औरंगाबाद येथील गरुडझेप अॅकॅडमी परिवाराच्या ४ मुलीं गोल्ड मेडल जिंकत गरुड झेप परिवाराच्या यशात मानाचा तुरा रोवला.

या स्पर्धेत ईश्वरी निलेश सोनवणे हिने ४४ किलो (कॅडेट) वजन गटात गोल्ड मेडल मीळवले तर किंजल निलेश सोनवणे हिने २४ किलो सब जूनियर गटात गोल्ड मेडल मिळवले तसेच समीक्षा सुरेश सोनवणे हिने २२ किलो सब जूनियर वजन गटात गोल्ड मेडल मिळवले, तर आराध्या गणेश सोनवणे हिने २६ किल जूनियर वजन गटात गोल्ड मेडल मिळवले. या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी एकूण ५ विद्यार्थी गेले होते त्यातील ४ मेडल एकाच परिवारातील बहिणींनी पटकावले, तसेच वेदांत अजित जैन याने २६ किलो सब जूनियर गटात कास्य पदक मिळवले. एकाच परिवारात ४ गोल्ड मेडल मिळविणे हि अत्यंत अभिमानाची गोष्ट असून त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांना गरुडझेप स्पोर्ट्स क्लबचे संतोष बसनेत व सुनील बसनेत यांनी मार्गदर्शन केले.
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.
मो.8484818400