पोलिस प्रशासनासह सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांचा पुढाकार

वाशिम :- मंगरुळपीर पोलिसांना राञी गस्तीदरम्यान निराधार बेसहारा असलेल्या आणी शेगावमधुन भटकंती करत आपल्या चिमुकल्या तिन मुलासह वैशाली पवार नामक महिला व राजश्री वय-७ वर्षे,गजानन वय-४ वर्षे,श्रावणी वय-३ वर्षे असे तिन मुले बसस्टॅन्ड परिसरात आढळली.तिला आस्थेने विचारपुस करुन कुटुंबीयांची माहीती घेतली असता ती पतिसोबत शेगाव येथे राहत होती.तिच्या पति मरण पावल्यामुळे सदर महिला भिक मागुन तिचे व चिमुकल्या मुलांचे पोट भरत आहे.या महिलेचे आईवडिल पुर्वी बर्याच दिवसापासुन पुसदला राहत होते.पतीच्या निधनामुळे एकाकी पडलेली ही महिला शेगाव वरुन पुसदसाठी जात असतांना मंगरुळपीर बसस्थानक परिसरात मंगरुळपीर पोलीसांना गस्तीदरम्यान आढळली.तिची विचारपुस करुन तिला राञीबेराञी अशी बाहेर लहान मुलाबाळासह राहणे योग्य नाही असे समजावुन तिला पोलीसस्टेशनमध्ये आणुन राहन्याची व्यवस्था केली.चहा बिस्किटही पोलिसांनी त्या महिलेसह मुलांना खाऊ घातले.तिच्या कुटुंबियांशी भेट आणी ऊदरनिवार्वाहासाठी पुढील व्यवस्था लावावी याकरीता सामाजिक जाणिवेतुन विचार करुन समाजकार्यात अग्रेसर असणार्या पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना माहीती दिली.भगत यांनी तात्काळ पोलिस स्टेशनला जावुन त्या महिलेसह चिमुकल्या मुलांची विचारपुस केली आणी महिला व बालकल्याण विभाग वाशिम यांचेशी संपर्क केला.बालसरंक्षण अधिकारी भगवान ढोले यांनी त्यांचे पथक मंगरूळपीरसाठी रवाना केले तसेच चाईल्ड हेल्पलाइन टिमशीही संपर्क केला.

सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी सदर महिला ज्या समाजाची आहे त्या समाजातील मंगरुळपीर येथील सोळंके यांचेशी संपर्क करुन पो.स्टे.ला बोलावुन घेतले आणी यांचे कुणी नातेवाइक ओळखीचे आहे का याविषयी माहीती घेतली.सदर महिला ओळखीचीच असल्यामुळे काही नातेवाईक आणी सोयर्याधायर्यांच्या गावाचीही माहीती दिपक सोळंके यांनी दिली.नंतर चिमुकल्या मुलांना भुक लागल्याने त्यांना जेवणाचीही व्यवस्था फुलचंद भगत आणी सहकारी व पोलीसांच्या मदतीने केली.महिला बालकल्याणचे कर्मचारी व चाइल्ड हेल्पलाइनची टिम तसेच मंगरूळपीर पोलीस विभाग आता प्रशासकिय दृष्टिकोणातुन सदर महिला व त्यांच्या मुलांच्या संगोपण आणी राहण्यासाठी काय भुमिका घेता येइल याविषयी चर्चा करण्यात आली.वरिष्ठांच्या सल्ल्याने सदर कुटुंबियांना मदत करण्यात येइल असे अधिकार्यांनी सांगीतले.
फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206