
हिंगोली : जिल्ह्यातील राहोली खुर्द येथील 100 महिलां लाभार्थ्यांना पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत गॅसचे वाटप करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे उज्वला गॅस योजने सुरू केली असून या योजने मध्ये गोरगरीब महिलांना गॅस,सेगडी मोफत दिली जात असुन आज हिंगोली तालुक्यातील राहोली खुर्द येथील 100 लाभार्थी महिलांना गॅस वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री. पप्पू भाऊ चव्हाण यांच्या हस्ते 100 गरजू लाभार्थी महिलांना उज्जवला योजनेहअंतर्गत गॅस वाटप करण्यात आले.महिलाच्या तोंडावर हसु फुलले होते.