मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन
वाशिम : 3 डिसेंबर हा दिवस मराठी पत्रकार परीषदेचा वर्धापन दिन असल्याने या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक पत्रकाराची आरोग्य तपासणी करण्यात यावी, अशा सूचना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कारंजा येथील उपजिल्हा रूग्णालयात 3 डिसेंबर शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयेाजन कारंजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते.

या शिबीरात कारंजा शहरासह ग्रामीण भागातील 51 पत्रकारांची उपजिल्हा रूग्णालयातील तज्ञ डाॅक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. यात रक्तदाब, मधूमेह, इसी जी, ब्लडग्रुप तपासणी यासह लिक्विड प्रोफाईल तपासणीचा समावेश हेाता. आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून तहसिलदार धीरज मांजरे तर प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकिय अधीक्षक डाॅ भाउुसाहेब लहाने, तालुका वैद्यकिय अधिकारी डाॅ किरण जाधव व पत्रकार संघाचे समन्वयक गोपाल पाटील भोयर यांच्यासह उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकिय अधिकाÚयांची व पत्रकारांची उपस्थिती होती. आयोजित आरोग्य तपासणी शिबीरात परिचारिका अर्चना ठाकरे, संध्या राउुत, जयश्री इंगळे, कांचन कटके, इंदुताई राठोड, प्रयोगशाळा तंत्रज्ञ गणेश इंगळे ,वैशाली राउुत , महेंद्र परिहर, दिपक भारती, चंदन वासनिक , चैधरी , राहुल तंबोले, सागर घोगलिया, गोकर्णा, यांच्यासह डाॅ. राठोड, डाॅ. सुषमा उपाध्ये, डाॅ लकडे व डाॅ वर्षा लिंगायत यांनी पत्रकारंाची विविध प्रकारची आरोग्य तपासणी केली. शिबीराच्या यशस्वीतेसाठी कांरजा तालुक्यातील पत्रकारांनी व उपजिल्हा रूग्णालयातील अधिकारी व कर्मचाÚयांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन विजय काळे यांनी केले तर प्रफुल्ल बानगावकर यांनी आभार मानले..0