पक्षश्रेष्ठी यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

वाशिम : कारंजा नगर पालिकेतील विद्यमान भारिपचे १९ नगर सेवक तसेच मानोरा नगर पंचायतीचे ४ नगर सेवक व माजी नगराध्यक्ष सह शेकडो कार्यकर्त्यांनी मो. युसूफ पुंजानी यांच्या नेतृत्वात मुंबई येथील राष्ट्रवादी भवातनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष ना.जयंतदादा पाटील, गृहमंत्री ना.दिलीप वडसे, ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ,पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दि. ०२ डिसेम्बर रोजी प्रवेश केला आहे.

आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमांतर्गत माजी जि.प. सभापती वाशीम व माजी नगराध्यक्ष हेमेन्द्र ठाकरे,कारंजा नगर परिषद उपाध्यक्ष जुम्मा पप्पूवाले, सत्ताधारी गटनेते व सभापती ऍड. फिरोज शेकूवाले, नगरसेवक सलीम गारवे, अ. एजाज अ. मन्नान, चांद शाह, जावेद्दोदिन शेख, इरफान खान, जाकीर शेख,सलीम प्यारेवाले, राजू इंगोले, अब्दुल राशीद, जाकीर अली, आरिफ मौलाना, सैय्यद मुजाहिद, निसार खान, डॉ.धनंजय राठोड,मो. फैजल नागानी,संतोष भोयर,गोपाल खोडके, सोहेल अन्सारी, अब्दुल बशीर, शेषराव राठोड सह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या वेळी वाशीम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, पक्ष निरीक्षक संजय रोडगे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, बाबाराव खडसे, सोनाली ठाकूर, अशोक परळीकर, प्रवीण कुंटे, जावेद हबीब, मतीन कामले, सुनील पाटील, वाहिदोद्दीन शेख,प्रशांत गोळे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *