🚨 शेगाव शहर पोलिसांत आरोपीसह बहिणीवर गुन्हा दाखल.

बुलढाणा – नांदुरा शहरातील एका ३७ वर्षीय विवाहितेला चहातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने एवढ्यावरच न थांबता, पीडितेचे नग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत जवळपास नऊ महिने तिचे शारीरिक शोषण केल्याची तक्रार शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.


गुंगीचे औषध देऊन अत्याचार

पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, नांदुरा येथील ३७ वर्षीय विवाहित महिलेला आरोपी सचिन ज्ञानेश्वर चोपडे (वय ३८, रा. शेगाव) याने त्याच्या राहत्या घरी बोलावून घेतले. तिथे त्याने तिला चहातून गुंगीचे औषध दिले. पीडित महिला शुद्धीवर नसताना आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.


नऊ महिने चालले शोषण; बहिणीनेही केली मदत

पहिल्या अत्याचाराचे नग्न फोटो आणि व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याच्या धमक्या देऊन आरोपी सचिन चोपडे याने पीडित महिलेचे पुढील नऊ महिने वारंवार शारीरिक शोषण केले. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीला या दुष्कृत्यात त्याची बहीण हिनेही मदत केल्याचे समोर आले आहे.


आरोपीसह बहिणीवर गुन्हा दाखल

पीडित महिलेच्या तक्रारीवरून, शेगाव शहर पोलिसांनी मुख्य आरोपी सचिन ज्ञानेश्वर चोपडे याच्यासह त्याला मदत करणाऱ्या बहिणीविरुद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे.

दोघांविरुद्ध कायमी अपराध नंबर ५२३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ६४ (२) (m), ३५१ (२), ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

(प्रतिनिधी – संजय दांडगे, बुलढाणा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *