दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस सतर्क.
ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी घेतली सुरक्षा पाहणी.
अजिंठा लेणी परिसरासह विविध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची पाहणी.
लेणी परिसरात प्रवेशाच्या मार्गांवर पोलीस नाकाबंदी वाढवली.
दिल्ली लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस प्रशासन अलर्ट आणि सतर्क झाले आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी आज अजिंठा लेणी परिसरासह विविध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सुरक्षा पाहणी केली. त्यांनी सिक्युरिटी ऑडिट करून संबंधित अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. अजिंठा लेणी परिसरात प्रवेश करणाऱ्या अजिंठा व्ह्यू पॉईंट मार्ग आणि अजिंठा टी पॉईंट मार्गावरही पोलीस नाकाबंदी वाढविण्यात आली आहे. या पाहणीत फरदापूर आणि अजिंठा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.
एनटीव्ही न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर
