जामखेड नगरपरिषद निवडणूक अंतिम टप्प्यात असताना न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवार दि. २ रोजी होणारी निवडणूक प्रभाग दोन ब व प्रभाग चार ब स्थगित करण्यात आली आहे. २० डिसेंबर रोजी निवडणूक होईल असे आदेशात म्हटले आहे.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना छाननी दिवशी माजी नगराध्यक्षा अर्चना सोमनाथ राळेभात व भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी यांच्या सासुबाई अंजली अरूण चिंतामणी यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली असून त्यांची सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी झाली होती. अर्ज निकाली काढले होते. काल न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतीं साठी राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भक्र. ५ दिनांक ०४/११/२०२५ रोजी नुसार निवडणूक कार्यक्रम देण्यात आला होता. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णया विरोधात व्यथित उमेदवारास जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्याची निवडणूक नियमात तरतूद आहे व त्यानुसार व्यथित उमेदवाराकडून अपिल दाखल केले

होते.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी काढलेल्या आदेशानुसार न्यायालयीन अपिलीय अपिल दाखल केलेल्या जामखेड नगर परिषदेच्या त्या दोन जागांसाठी दि. ४. डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी सदर निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करतील. तर दि. १० डिसेंबर रोजी ३:०० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ११ रोजी चिन्ह वाटप व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे, दि. २० डिसेंबर रोजी मतदान २१ डिसेंबर रोजी मतमोजणी व २३ डिसेंबर रोजी निवडणूक जिंकलेल्या उमेदवारांची नावे गॅझेट मध्ये जाहीर करणे असा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

२४ नोव्हेंबर रोजी हि सुनावणी झाली होती. आणि अर्ज निकाली काढले होते त्याचा काल न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यक्रम जाहीर करण्यात आला. जामखेड नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना छाननी दिवशी माजी नगराध्यक्ष अर्चना सोमनाथ राळेभात व भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी यांच्या सासुबाई अंजली चिंतामणी यांचा अर्ज अवैध ठरविल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने त्याची हि सुनावणी करण्यात आली आहे

नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *