आ. रोहित पवारांची पोलीस अधिक्षाकडे कडक बंदोबस्ताची मागणी

जामखेड नगरपरिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून उद्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर शहरातील काही प्रभागांत स्थानिक गुंडांकडून भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याची माहिती पुढे येत आहे. गाड्या फोडणे, फ्लेक्स फाडणे, कार्यकर्त्यांना धमकावणे असे प्रकार सुरू झाल्याने मतदारांमध्ये दहशत निर्माण होत असून त्याचा थेट परिणाम मतदान प्रक्रियेवर होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक घार्गे यांना त्वरीत पोलीस बंदोबस्ताची मागणी पत्राद्वारे केली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शहरात पुरेसा पोलीसबळ तैनात करून गुंड प्रवृत्तींचा

बंदोबस्त करण्यात यावा, असंही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

जामखेड नगरपरिषद निवडणूक अंतिम टप्प्यात असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. निवडणूक शांततापूर्ण, स्वच्छ व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी संवेदनशील मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्याचीही मागणी आमदार पवार यांनी केली आहे.

नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *