शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे येत्या 4 डिसेंबरपासून चेतक महोत्सव भरवला जाणार आहे. श्री. दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा भरते. येथील यात्रा ही पारंपरिक व ऐतिहासिक यात्रा ठरली. कारण तिला 350 वर्षांचा इतिहास आहे.
सारंगखेडाची यात्रा ही घोडेबाजारासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांसारख्या युगपुरुषांनीही या यात्रेतून घोडे खरेदी केल्याचा इतिहास या यात्रेचा आहे.यावर्षी अरब राष्ट्राच्या पार्श्वभूमीवर अश्वांच्या विविध स्पर्धा भरवल्या जाणार आहे.
सारंखेडा यात्रा भरवला जाणारा चेतक फेस्टिवल मध्ये यंदा अश्वांच्या विविध स्पर्धा भरणार आहेत. यावर्षी चेतक फेस्टिवल मध्ये घोड्यांचा राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धकांना संधी देण्यात येईल. यंदा घोड्यांच्या स्पर्धेत पोल बेंडिंग, अश्व नृत्य स्पर्धा, अश्व रेस स्पर्धा, अश्व क्रीडा स्पर्धा सह विविध प्रजातीतील अश्वांची सौंदर्य अशा स्पर्धा रंगणार आहेत.
सारंगखेडा यात्रेत प्रसिद्ध असलेले अश्व देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.एक हजारापेक्षा अधिक अश्व येथे दाखल झाले आहेत. घोडेबाजारात भारतातील विविध कानाकोपऱ्यातून घोडे खरेदी-विक्रीसाठी दाखल होतात. प्रामुख्याने गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, केरळ, राजस्थान, महाराष्ट्रासह अनेक राज्यातील घोडे सारंगखेडा यात्रेत आणले जातात.50 हजारांपासून कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या घोड्यांची येथे खरेदी-विक्री होते. दरवर्षी 3 कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल होत यात्रेत होत असते. यावर्षी हा विक्रम मोडणार याची उत्सुकता अश्वप्रेमीमध्ये लागली आहे. यात्रेच्या नियोजनाला संपुर्ण तयारी झाली आहे. यात्रा 4 डिसेंबर पासून 21 डिसेंबर पर्यंत चालणारी सारंखेडाची यात्रा व चेतिक फेस्टिवल हे अश्व शौकिनांसाठी मेजवानीच ठरेल.
बाईट: जयपालसिंह रावल, अध्यक्ष, चेतक महोत्सव, सारंगखेडा.
एनटीव्ही न्यूज मराठी, नंदुरबार.
