जालना = सिल्लोड शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर संचलित सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जाफराबाद येथे राष्ट्रीय सेवा योजना व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबिरात जाफराबाद येथील डाॅ.पंकज वासुदेव म्हस्के यांनी विद्यार्थिनींची सखोल तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. टी. देशमुख यांनी विद्यार्थिनींच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एस. पी. जगतवाड यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या समस्या वेळीच ओळखता येतात, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रा. बी. एन. म्हस्के, प्रा. डॉ. पी. जे. मिसाळ, प्रा. युवराज वाघ, प्रा. बी. ए. येवले, प्रा. ए. आर. वैद्य तसेच प्रा. विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित प्राध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थिनींना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले.
या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी घेतला. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी यशस्वीरीत्या पार पाडले.
प्रतिनिधी राहुल गवई जाफराबाद जालना
