जाफराबाद प्रतिनिधी दिनांक 29/12/2025 येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. दादासाहेब म्हस्के यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त डॉ.सतीश ठोंबरे लिखित ” यशस्वी जीवनाचे राजमार्ग ” या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश देशमुख हे होते यावेळी विचार मंचावर उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनील मेढे उपप्राचार्य डॉ.श्याम सर्जे उपप्राचार्य प्रा.विनोद हिवराळे आणि पुस्तकाचे लेखक प्रो.डॉ.सतीश ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सिल्लोड शिक्षण संस्था संचलित छत्रपती संभाजीनगर चे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी मा.दादासाहेब म्हस्के यांचा वाढदिवस दरवर्षी विविध उपक्रमाने साजरा केला जातो याचेच औचित्य साधून डॉ.सतीश ठोंबरे लिखित यशस्वी जीवनाचे राजमार्ग या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी जाफराबाद तालुक्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.सदर विद्यार्थ्यांना मा.दादासाहेब म्हस्के यांच्या हस्ते पुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच सिद्धार्थ महाविद्यालयातील शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये राज्यस्तरीय खेळाडूंना ट्रॅक सूट चे ही वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनील मेढे यांनी केले तर पुस्तकाचे लेखक डॉ.सतीश ठोंबरे यांनी आपल्या मनोगतामध्ये यशस्वी जीवनाचा राजमार्ग या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणे सोपे जाईल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जर लाभले तर ते जीवनामध्ये यशस्वी होतील तेव्हा विद्यार्थ्यांनी सदरील पुस्तकाचे वाचन करून आपल्या जीवनाचा मार्ग ठरवावा असे आवाहन केले तर मा. दादासाहेब मस्के यांनी सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच केंद्रीय लोकसेवा आयोग असेल किंवा अन्य स्पर्धा परीक्षा असतील यासाठी आपल्या महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे त्या केंद्रामार्फत योग्य ते मार्गदर्शन घेऊन तसेच आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये क्रमिक पुस्तकांबरोबर स्पर्धा परीक्षांचेही अनेक पुस्तके उपलब्ध आहेत त्यांचाही अभ्यास करून स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन केले.अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.रमेश देशमुख यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.एम.पाटील यांनी केले तर आभार प्रा.बी.ए.येवले यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रसिद्ध प्रमुख प्रा.अनिल वैद्य, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रोफेसर डॉ.विजय पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रतिनिधी राहुल गवई जाफराबाद जालना
